Shetkari Ladki Bahin शेतकरी भावांनो, आता वेळ आली आहे सावध होण्याची. सरकारने पीकविमा योजनेतील बोगस अर्ज करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024-25 च्या हंगामात तब्बल 5.9 लाख बोगस अर्ज सापडल्याने सरकारने पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची आणि आधार क्रमांक ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बोगस अर्ज म्हणजे नेमकं काय?
जर शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसेल, तरीही तो दुसऱ्याच्या जमिनीवर खोटं 7/12 उतारा दाखवून पीकविमा घेतो, तर तो अर्ज बोगस मानला जातो. तसेच, भाडेकराराची नोंदणी न करता बनावट कागदपत्रांवर विमा घेतल्यास, तोही फसवणूक म्हणून ओळखला जातो.
आता थेट गुन्हा दाखल होणार
राज्य सरकारने 2025-26 च्या खरीप व रब्बी हंगामासाठी नवीन शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयानुसार, बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
तहसीलदारांना हे अधिकार देण्यात आले आहेत.
जर एखाद्या अर्जात खोटं 7/12, बनावट भाडेकरार किंवा खोटा पीकपेरा आढळून आला, तर संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई होईल.
काळ्या यादीत समावेश व आधार ब्लॉक
बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. यासोबतच त्यांचा आधार क्रमांक ब्लॉक करण्यात येईल. याचा थेट परिणाम म्हणजे:
–पीएम किसान
–नमो किसान
–लाडकी बहिण योजना
या सारख्या योजनांचे लाभ मिळणार नाहीत. कोणतेही अनुदान, सवलत, किंवा आर्थिक मदत या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांत मिळणार नाही.
CSC केंद्रांवर संशय
या घोटाळ्यात अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चा हात असल्याचे समोर आले आहे. मागच्या वर्षी:
-170 CSC केंद्रांचे लॉगिन रद्द
-63 केंद्रांवर FIR
-04 ऑपरेटर महाराष्ट्राबाहेरील असल्याचे उघड
विशेषतः बीड जिल्ह्यातील केंद्रांमध्ये हे प्रकार अधिक प्रमाणात आढळले आहेत.
सरकारचा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांना
कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, “बोगस अर्ज करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि गरजूंना न्याय मिळेल.” खोटे कागदपत्र देऊन मिळवलेले पैसे आता वाचणार नाहीत. उलट, त्याचा फटका पुढील योजनांवरही बसणार आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
-तुमच्या नावावरच असलेली जमीन असल्यासच पीकविमा घ्या.
-जर भाडेकरार असेल, तर त्याची नोंदणी करून योग्य अर्ज भरा.
-फक्त प्रामाणिक व खरी माहिती वापरा.
-CSC केंद्रावर पूर्ण विश्वास न ठेवता, स्वतःही माहिती तपासा.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1: बोगस पीकविमा अर्ज म्हणजे काय?
खोट्या कागदपत्रांवर घेतलेला विमा अर्ज बोगस मानला जातो.
Q2: सरकारने काय कारवाई जाहीर केली आहे?
5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून आधार क्रमांक ब्लॉक केला जाईल.
Q3: आधार ब्लॉक झाल्यावर काय परिणाम होतो?
कोणतीही योजना, अनुदान किंवा सवलत मिळत नाही.
Q4: गुन्हा कोण दाखल करू शकतो?
तहसीलदारांना थेट गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे.
Q5: CSC केंद्रांचा यात काय सहभाग आहे?
अनेक CSC केंद्रांवर फसवणुकीसाठी FIR दाखल करण्यात आले आहेत.