IMD Alert July राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दमदार पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, २० जुलै रोजी राज्यात अनेक भागांना जोरदार पावसाचा धोका असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता, यलो अलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढणार; घाटात सावधगिरी आवश्यक
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे स्वरूप तीव्र होणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाट परिसर याठिकाणी पावसाचा जोर अधिक जाणवेल. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात विजांचा कडकडाट; काही ठिकाणी मध्यम सरी
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा
संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण विदर्भात अलर्ट! मुसळधार पावसाची शक्यता
विदर्भातील नागपूर, अमरावतीसह सर्व ११ जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1: २० जुलै रोजी महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस होणार आहे?
२० जुलै रोजी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Q2: कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे?
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, नागपूर, अमरावतीसह एकूण १९+ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
Q3: मुंबईत पावसाची काय शक्यता आहे?
मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Q4: विदर्भातील किती जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे?
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Q5: नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे, विजांच्या गडगडाटाच्या वेळी सुरक्षित जागी थांबावे आणि हवामान अपडेट्स लक्षात ठेवावेत.